मुंबईत आज किती वाजता आणि कुठे होणार मॉक ड्रील? जाणून घ्या वेळ..


मुंबई : भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात युद्धजन्य परिस्थितीचा सराव म्हणून मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये हा सराव होणार असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ६० ठिकाणी हे मॉक ड्रील पार पडणार आहे.

मुंबईत आज दुपारी ४ वाजता मॉक ड्रील सुरू होणार असून, विविध परिसरांमध्ये सायरन वाजवले जातील. विशेष म्हणजे या सरावादरम्यान नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असून, दक्षिण मुंबईतील एका मैदानात नागरिकांना जमा होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय यंत्रणांकडून प्राप्त अलर्टनुसार, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील होणार आहेत. या दरम्यान, मुंबईच्या उपनगरातील एका छोट्या भागात वीजपुरवठा तात्पुरता बंद केला जाणार आहे.

परिसर निर्मनुष्य करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा सराव केला जाईल. यामध्ये नागरी संरक्षण विभागाकडून अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार असून, प्रत्येक नागरिकाला यामध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणेच पुण्यातही ८५ ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. एफसी कॉलेज, आगा खान पॅलेस, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, कृषी महाविद्यालय, खडकी कँटोनमेंट यांसारख्या प्रमुख ठिकाणी सायरन वाजवले जातील. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने हा सराव अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!