नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या..


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. नवीन इमारतीत देशातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. नवीन संसद भवनात राज्यसभा आणि लोकसभेसोबतच एक संविधान सभागृहही बांधण्यात आले आहे. त्यात देशाच्या संविधानिक वारशाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

नवीन इमारतीतील लोकसभेत 888 खासदारांची बसण्याची क्षमता असेल. तर राज्यसभेचा आकार लोकसभेपेक्षा लहान असेल. राज्यसभेत 384 खासदार बसू शकतील. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहात होणार आहे.

यामध्ये 1280 खासदार एकत्र बसू शकतील. नवीन इमारतीत खासदारांच्या सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. संसद भवनाच्या गरजेवर काँग्रेससह सर्वच पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. यावर इंदूरच्या माजी खासदार सुमित्रा महाजन म्हणाल्या की, संसदेची नवीन इमारत आवश्यक आहे. जुने संसद भवन ही 100 वर्षे जुनी इमारत होती.

वरिष्ठ सभागृहातील डिझाइन ही राष्ट्रीय फुल असलेल्या कमाळाच्या पाकळ्यांप्रमाणे आहे. तर लोकसभेतील डिझाइन ही मोरपंखांप्रमाणे आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

सध्याचं संसद भवन हे 2 हजार 428.16 स्वेअर मीटर क्षेत्रावर पसरलेलं आहे. तर संसदेची नवीन इमारत ही 64 हजार 500 स्वेअर मीटरवर पसरलेली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!