Weather Update : राज्यासाठी आणखी दोन दिवस महत्वाचे, ‘या’ ठिकाणी पाऊस अन् गारपीट होण्याची शक्यता, जाणून घ्या..


Weather Update : राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. अशात राज्याला पुन्हा एकदा गारपिटीसह अवकाळी पाऊसाने चांगलंच झोडपून काढले आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात बहुतांश भागांत गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच आता कोकणातला पाऊस कमी झाला असून, उर्वरित राज्यात मात्र अजून दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Weather Update

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने जम्मू-काश्मीरपासून शीत लहरी येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वत्र रविवारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला.

हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव मिळत आहे. राज्यात अजून दोन दिवस पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागात २८ व २९ रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, कोकणातला पाऊस कमी झाला आहे.

विदर्भातल्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, तूर, सोयाबीन, कापूस, गहू इत्यादीसह अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाचा हा तडाखा पुढच्या २ दिवस कायम असणार आहे. यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

”या’ भागात पावसाचा जास्त जोर राहणार…

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्याने मुंबई, पालघर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नगर, बीड, परभणी, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा या भागांत पाऊस राहील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!