Waqf Board : वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी देण्याचा आदेश रद्द, नेमकं कारण काय?

Waqf Board : वक्फ बोर्डाला तातडीने १० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला होता, अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा निर्णय घेतला होता. वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय निवडणुकांपुर्वी राज्य सरकारने घेतला होता.
काल २८ नोव्हेंबर रोजी जीआर काढण्यात आला. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मुख्य सचिव सुजिता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. Waqf Board
वक्फ बोर्डला निधी दिल्याचा एक जीआर काढण्यात आला, ही प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
यावेळी कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. असं असताना देखील हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला आहे अशी चर्चा होती. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर मुख्य सचिव सुजिता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.