मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना भाजपचा मोठा धक्का? राज्याच्या राजकारणात भूकंपाची चाहूल, घडामोडींना वेग


सातारा : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, सत्ताधारी समीकरणांमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटातील महत्त्वाचे नेते आणि आमदार महेश शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

कोरेगावमधील शिवसेनेच्या कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थिती आणि कार्यक्रमातून त्यांचा फोटो वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते जयकुमार गोरे यांनी महेश शिंदेंना भाजपमध्ये येण्याचं खुलेआम निमंत्रण दिल्याने चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. महेश शिंदे हे भाजपच्या विचारसरणीचे आहेत. त्यांना काही अडचण असल्यास त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, असे गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडींमुळे भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!