दिल्लीत मतदान झालं पण अरविंद केजरीवाल यांनी धक्का बसणार? सर्वांची झोप उडवणारा एक्झिट पोल आला समोर…

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोफा आता मतदान पेट्यात कैद झाल्या आहेत. दिल्लीकरांनी कोणाला मतदान केलं हे आता लवकरच समोर येणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली.

याठिकाणी मतदान पार पडल्यानंतर आता लगेचच एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. तर भाजपचे पुन्हा सत्तेत कमबॅक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. यामध्ये दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हातातून सत्ता जाताना दिसत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने जोरदार ताकद दिल्लीत लावली आहे.

यामुळे तब्बल 25 वर्षानंतर भाजपला दिल्लीच्या सत्तेत कॅमबॅक मिळत आहे. तर केजरीवाल यांना 10 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागणार असून हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. 8 तारखेला याबाबत निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

वेगवेगळ्या संस्थांनी याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. यामध्ये पी एमएआरक्यू यांनी आप – 21-31, भाजप – 39-49, काँग्रेस – 0-1 तसेच पीपल्स प्लस सर्व्हे यांनी आप – 10-19, भाजप – 51-60, काँग्रेस – 0 तसेच पीपल्स इन्साइट, आप – 25-29, भाजप- 40-44, काँग्रेस – 0 – 1, मार्टिज, आप – 32 -37 भाजप- 35 – 40, काँग्रेस – 0-1 पोल डायरी यांनी, आप – 18 -25, भाजप- 42-50, काँग्रेस – 0-2 असा अंदाज दिला आहे.
डीव्ही रिसर्चच्या सर्व्हेत आपला 26 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 36 ते 44 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेस खातंही उघडणार नसल्याचा हा पोल सांगत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.