नायगाव विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी विकास चौधरी..

उरुळी कांचन : नायगाव, पेठ सोरतापवाडी कार्यक्षेत्र असलेल्या नायगाव विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी विकास किसन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मावळते अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर या सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी सर्वानुमते विकास चौधरी यांना पसंती मिळाल्याने त्यांची अध्यक्षदी निवड झाली आहे. सचिव संतोष चौधरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
नायगाव विविध विकास सोसायटी ही अग्रगण्य सहकारी सोसायटी आहे. खतविक्रीसह विविध सुविधा सोसायटी मार्फत सभासदांना पुरविण्यात येत आहे. निवडीनंतर जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, ज्येष्ठ नेते बाळासाहेब चौधरी ‘ यशवंत’ चे संचालक विजय चौधरी, सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी, सुदर्शन चौधरी हे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी विकास चौधरी यांनी नायगावचे उपसरपंचपद भूषविले आहे.