जेवताना घेतलं शेजाऱ्याचं नाव; संतापलेल्या पतीने पत्नीचा गळाच आवळला, बीडमध्ये थरार


बीड : माजलगाव तालुक्यात मद्यधुंद अवस्थेत पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी साहेबराव भोजू पवार (वय ३७) याच्याविरोधात माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सविता पवार या बुधवारी सकाळच्या सुमारास घरासमोर नेहमीप्रमाणे काम करत होत्या. त्यावेळी त्यांचे पती साहेबराव पवार हे दारूच्या नशेत घरी आले आणि जेवणाची मागणी केली.

पत्नीने जेवण वाढल्यानंतर किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. शेजाऱ्याशी बोलण्याच्या संशयावरून आरोपीने वाद उकरून काढत “तू त्याच्याशी का बोलतेस?” असा जाब विचारला.

वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील वस्तू फेकून मारल्याने तिच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतरही तो न थांबता तिला खाली पाडून तिच्या हाताला चावा घेत गंभीर जखमी केले.

घटनेचा कळस तेव्हा झाला, जेव्हा आरोपीने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता. महिलेच्या आरडाओरडीनंतर नातेवाईकांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला आणि तिची सुटका केली.

यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!