महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी मंगेश जोशी यांची नियुक्ती…


मुंबई : मंगेश जोशी यांची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अलीकडील प्रशासकीय बदल्यांमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

जोशी यांनी २१ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील पर्यटन संचालनालयाच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. ते भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) अनुभवी अधिकारी असून यापूर्वी त्यांनी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे उपमहासंचालक म्हणून काम पाहिले आहे.

प्रशासकीय सुधारणा, धोरणात्मक नियोजन आणि प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर आता राज्याच्या पर्यटन विकासाला गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना जोशी म्हणाले, “महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध राज्य आहे. विद्यमान धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यटन स्थळांची जागतिक स्तरावर प्रसिद्धी करणे ही आमची प्राथमिकता असेल.”

तसेच महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रगण्य आणि सुरक्षित स्थळ म्हणून ओळख मिळवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा जपत आधुनिक सुविधांद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग ची स्थापना ३१ मे २००६ रोजी करण्यात आली असून राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाच्या जतन व विकासासाठी हा विभाग कार्यरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!