ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


मुंबई : मराठी आणि हिंंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ व्या वर्षांच्या होत्या.

सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते.

म ळालेल्या माहितीनुसार गेल्या जवळपास वर्षभर त्या वयोमानानुसार आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या.

अभिनवदेखील मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. सीमा यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सीमा यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांची संख्या ऐंशीच्या घरात आहे. १९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी परंतु संस्मरणीय आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!