Vanraj Andekar : दीड महिन्यांपासून रेकी, हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर; मर्डर करून कुठल्या रस्त्याने पळून जायचं याचाही प्लॅन, वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी कसा रचला कट?


Vanraj Andekar : पुण्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदेकर यांच्या हत्येसाठी दीड महिन्यांपूर्वीच कट रचला होता. त्याच्या हत्येसाठी आरोपींनी संपूर्ण तयारी करूनच हत्या केली. या घटनेने नंतर पूर्ण राज्य हादरले आहे.

या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता.

वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, जयंत कोमकर यांनी प्लॅन आखला होता. सोमनाथ गायकवाडने अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती. Vanraj Andekar

रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखला गेला आणि रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. अनिकेत दुधभातेने इतर आरोपींची जुळवाजुळव केली. त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला . तेथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने वार केले.

आंदेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्याने पळून जायचं याची देखील आरोपींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळून गेले. या हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!