Vanraj Aandekar : मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणातील अजून एक महत्वाचा आरोपी अटकेत, पोलिसांची मोठी कारवाई…


Vanraj Aandekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आरोपींना पिस्तुल पुरविणार्‍यास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड (वय २४, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुख वाडी, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत २१ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान आबा खोंड याने आरोपींना पिस्तुल पुरविण्यास मदत केल्याचे समोर आले होते.

पोलीस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खोंड हा घरी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवणे येथील त्याच्या घराजवळ सापळा रचला. तो घरी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याला २५ सप्टेबर रोजी रात्री अटक करण्यात आली. Vanraj Aandekar

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे , पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, सहायक फौजदार राहुल मखरे, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, निलेश साबळे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!