Uruli Kanchan : दारुच्या नशेत अज्ञात दोघांनी बाटली फेकून दोघांना बेदम मारले! उरुळीकांचन येथील तळवाडी चौकातील घटना..!!

Uruli Kanchan : उरुळीकांचन : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी दोघांना डोक्यात बाटल्या फेकून गंभीर मारहाण केल्याचा प्रकार उरुळीकांचन येथील तळवाडी चौकात घडला आहे. या प्रकरणी दोघांनी अज्ञात आरोपींवर तक्रार दिली आहे.
अतुल अनिल धोत्रे व तुषार अनिल टिळेकर (रा. बगाडेमळा, उरुळीकांचन, ता. हवेली, जि.पुणे ) असे मारहाण केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोघेही स्थानिक असून ते दारूच्या नशेत रस्त्यावर चालले असताना अज्ञात दारुच्या नशेत दोघांनी बाटल्या फेकून जखमी करून मारहाण झाल्याची तक्रार दोघांनी दिली आहे. Uruli Kanchan
दरम्यान उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काळापासून अल्पवयीन गुन्हेगारांचा प्रचंड उच्छाद माजला आहे. गुन्हेगार खुलेआम कायदा व्यवस्थेला झुमानत नसल्याची परिस्थिती आहे.पोलिसांचे या परिस्थितीवर नियंत्रण आहे का ? म्हणून नागरीक पोलिसांच्या कार्य – क्षमतेवर सवाल उपस्थित करु लागले आहेत.