लाडकी बहीण योजनेत मोठा अलर्ट! 30 एप्रिलनंतर लाभ थांबणार? तुमचं नाव यादीत आहे का?

पुणे : मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभर चर्चेत आहे. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

मात्र आता या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’साठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता अवघ्या चार दिवसांवर आली आहे.
३० एप्रिल २०२६ ही ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिली होती. तरीही अजून सुमारे २६ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, ही बाब समोर आली आहे.

राज्यात या योजनेचे जवळपास २ कोटी ४७ लाख लाभार्थी आहेत. मात्र आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे मोठ्या संख्येने महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
आज (२७ एप्रिल) स्थितीनुसार, मुदत संपण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. या अल्प कालावधीत सर्व लाभार्थींनी प्रक्रिया पूर्ण करणे कठीण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३० एप्रिल रोजी बँका बंद होईपर्यंत पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र त्यानंतरही ई-केवायसी पूर्ण न झाल्यास हे २६ लाख लाभार्थी कायमस्वरूपी योजनेबाहेर जाऊ शकतात.
त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना योजनेचा लाभ आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागू शकते.