Uruli Kanchan : सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा आदर्श शाळा म्हणून सन्मान, विश्वस्त आणि शिक्षकांनी स्वीकारला पुरस्कार..

Uruli Kanchan उरुळीकांचन : पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत तालुकास्तरावर आदर्श शाळा म्हणून हवेली तालुक्यातून सोरतापवाडी(ता.हवेली)येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा आदर्श शाळा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुविद्य पत्नी किरण वळसे पाटील यांच्या हस्ते विद्यालयाचे विश्वस्त ,शिक्षक यांनी पुरस्कार स्विकारला आहे.

माध्यमिक संस्थाचालक मंडळ पुणे ग्रामीण यांच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श माध्यमिक शाळांना त्यांच्या उत्कृष्ट संचलन म्हणून आदर्श शाळा पुरस्कार तालुकानिहाय देण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी अवसरी -खुर्द (ता.आंबेगांव ) येथे पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय पुरस्कारांचे वितरण संस्थाचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी हवेली तालुक्यातून पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरोगामी माध्यमिक विद्यालयास किरण वळसे पाटील यांच्या हस्ते पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचेअध्यक्ष बाळासाहेब चोरघे,उपाध्यक्ष रामदास चौधरी तसेच विश्वस्त मंडळ व शिक्षक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमास संयोजक प्रदिप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे ,आमदार शरद ढमाले ,अमित बेनके ,संस्था चालक मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते,उपाध्यक्ष अनिल मेहेर गणपत बालवडकर, भगवानराव साळुंखे, नंदकुमार सागर , महादेव कांचन,शिवाजी घोगरे तसेच पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रंगनाथ कड, राजेंद्र रतन चौधरी,डी.वाय. चौधरी मुख्याध्यापक प्रविण गायकवाड पुरस्कार स्विकारताना उपस्थित होते. Uruli Kanchan

पूर्व हवेली तालुक्यात सोरतापवाडी , नायगाव, पेठ, तरडे व प्रयागधाम या ग्रामवासियांसाठी पुरोगामी विद्यालय ही संस्था कार्यतर आहे. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण या ठिकाणी उपलब्ध असून ९७० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. प्रशस्त इमारत, क्रिडांगण, ई- क्लासरूम,प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षणासह सांस्कृतिक कार्यक्रम ,क्रीडा विषय तसेच योग शिक्षण , कवायत यांसारख्या कला गुणांना शिक्षणातून वाव दिला जात आहे. या विद्यालयास क्वालिटी कंट्रोल चे आय.एस.ओ. मानांकन तसेच विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष
बाळासाहेब चोरघे यांनी दिली आहे .
