Uruli Kanchan : प्रयागधाम फाट्यावर भीषण अपघात! टेम्पो व सिमेंट बल्करच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…


Uruli Kanchan : राज्यात सध्या अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. आता पुणे – सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा परिसरात टेम्पो व सिमेंट बल्करच्या विचित्र अपघातात टेम्पोचालक व बल्कर चालक अशा दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

अदणाम यामुदआली हुसेन (वय -२७ , रा. बेल्कर, धर्मपूरी , उत्तरप्रदेश ), पार्थ रत्नसिंग शितोळे (वय-२०, रा.पडवी, ता. दौंड , जि.पुणे ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  हि घटना मंगळवारी (ता. १० ) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास  घडली आहे. Uruli Kanchan

मिळालेल्या माहिती नुसार, ट्रक क्र. एम.एच.१२क्यूजी ७२२२  सोलापूर बाजूकडून पुण्याच्या बाजूकडे निघाला होता. ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व ट्रक हा दुचाजक तोडून सोलापूर बाजूकडे निघालेल्या बल्कर क्र. एमएच ०१ पीआर ६८५१ जाऊन  आदळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.

हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी नागरिकांच्या व उरुळी कांचन पोलिसांच्या मदतीने दोन्ही चालकांना गाडीतून बाहेर काढले.

यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता दोघांचेही निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!