Uruli kanchan : उरुळीकांचन येथे गुन्हेगारीची परिसिमा! पूर्ववैमनस्यातून तोंड बांधून दिवसाढवळ्या मोबाईल दुकान फोडले…!!

Uruli kanchan : उरुळीकांचन : पूर्ववैमनस्यातून ५ ते ६ जणांच्या टोळक्याने तोंडाला कापड बांधून मोबाईलच्या दुकानाची नासधूस करुन तोडफोड केल्याची घटना उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील महात्मा गांधी रस्त्यावर घडली आहे. या हल्लेखोरांनी हल्ला करताना कोयते व हत्यारांचा वापर केल्याने या प्रकाराने मोठा दहशत करण्याचा प्रकार दिवसाढवळ्या घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा घडलेल्या या प्रकाराने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अक्षय हनुमंत कुंजीर (वय-३०, रा. वळती, ता. हवेली ,जि. पुणे) असे हल्ला करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पूर्ववैमनस्याच्या घडलेल्या प्रकाराने संक्षयित हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून अक्षय कुंजीर याच्याशी गावातीलच काही तरुणांचा वाद झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी झाला आहे. या वादाचा बदला म्हणून तक्रारदार अक्षय कुंजीर यांच्या मोरया मोबाईल शॉपीत अज्ञात ५ ते ६ जण घुसून त्यांनी कोयते व हत्यारे घेऊन दुकानात शिरले व दुकानात मोबाईल साहित्य व फर्निचर या साहित्याची मोडतोड करुन हे सर्व जण तक्रारदार याला धमकावून निघून गेले आहेत. Uruli kanchan
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या या वादातून हा प्रकार घडला असवा असा अंदाज असून पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घडलेल्या या कायदा हातात घेण्याचा बिहारी कृत्याने नागरीकांत भयभीत वातावरण आहे.