UPSC : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! UPSC कडून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर…

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाइट https:/// upsc. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाइट https:/// upsc. gov. in/ exams/ exam- calendar वर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाऊनलोड करू शकतात.
सुधारित वार्षकि कॅलेंडरनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेची अधिकृत अधिसूचना ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यानंतर अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात आहेत. UPSC
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसर्या टप्प्यातील परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परीक्षेची अधिसूचना 28 मे 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, १७ जून २०२५ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी अर्ज प्रक्रिया २२ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ही भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी घेतली जाईल. शिवाय भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२५ ही १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. नागरी सेवा परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ रोजी घेतली जाईल.
यूपीएससीद्वारे पहिल्या टप्प्यासाठी ११ डिसेंबर २०२४ रोजी सीडीएस परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली जाईल. परीक्षेसाठीचे अर्ज 31 डिसेंबर 2024 पर्यंत भरले जातील. ही परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. सीडीएस परीक्षा दुसरा टप्पा परीक्षेची अधिसूचना २८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध होईल.
दरम्यान, दुसर्या टप्प्यासाठी नोंदणी प्रक्रिया १७ जून २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. लेखी परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाईल. आयोगाने घेतलेल्या इतर भरती परीक्षांच्या तारखा तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.