अभूतपूर्व घडामोडी; बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश निश्चित, मोठा निर्णय जाहीर..

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, बच्चू कडू यांच्याबाबत नवा राजकीय कलाटणीचा मुद्दा समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बच्चू कडू यांनी मोठं विधान करत सांगितले की, मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहे. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेत आहे.” त्यांनी स्पष्ट केले की प्रहार संघटना कायम राहणार असून, ती सामाजिक काम करतच राहील.
ते पुढे म्हणाले की, शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने लढा देत राहतील. शिवसेना वाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मंत्रालय अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
