लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जुलै महिन्याच्या 1500 हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर


मुंबई : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने राज्यभरातील लाखो महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी लाभार्थींच्या खात्यात जमा झाला होता. मात्र, जुलै महिना संपत आला तरी नवीन हप्ता जमा झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सामान्यतः सरकारकडून प्रत्येक महिन्याचा हप्ता महिन्याच्या सुरुवातीच्या काळात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, प्रशासकीय प्रक्रियेमुळे काहीवेळा निधी वितरणात विलंब होऊ शकतो.

दरम्यान, जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत सोशल मीडियावर विविध दावे आणि तारखा फिरत असल्या तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी केवळ राज्य सरकारच्या अधिकृत घोषणांवर आणि संबंधित विभागाच्या माहितीकडेच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!