राज्यात दुष्काळ स्थितीने राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकांना मिळाली स्थगिती; हवेली तालुका खरेदी व्रिकी संघाची निवडणूक मात्र होणार..

पुणे : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये प्रशासकीय यंत्रणा मदत कार्यावर लक्ष केंद्रित करू शकावी, यासाठी राज्य सरकारच्या सहकार विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) सहकार विभागाने जारी केला आहे.

दुष्काळी परिस्थितीत शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात अडकल्यास त्याचा थेट फटका दुष्काळ निवारण आणि मदतकार्याला बसू शकतो. तसेच शेतकरी आणि सभासदही सध्या अडचणीत आहेत. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73 क मधील अधिकारांचा वापर करत शासनाने हा निर्णय घेतला आहे.
तथापि, या स्थगितीमधून काही संस्थांना वगळण्यात आले आहे.सर्व हाऊसिंग सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ववत सुरू राहतील.यामध्ये मात्र हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुका होणार आहेत.


यासाठी 21 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार असून 19 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत संघाच्या 19 जागांसाठी एकूण 303 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मर्यादित मतदार संख्या असली तरी संस्थेचे सहकार क्षेत्रातील स्थान,आर्थिक व्यवहार आणि राजकीय महत्त्व यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे
दरम्यान ज्या संस्थांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2026 पूर्वीच सुरू झाली आहे, त्यांच्या निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही.अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्ये केवळ मतदानाची प्रक्रिया बाकी असल्याने त्यांनाही या स्थगितीतून सूट देण्यात आली आहे.
ज्या संस्थांच्या निवडणुकीसाठी अद्याप अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नव्हती, त्या सर्व निवडणुका सध्या आहेत त्याच टप्प्यावर थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे दुष्काळी भागातील सरकारी यंत्रणेला मदतकार्य प्रभावीपणे राबवता येणार आहे.
