“…तर आता थेट सरकारच बदलू!”; अभिजीत दीपके यांचा इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : संभाजीनगर येथे परतले. विमानतळावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आंदोलनाचा आढावा घेत सरकारवर टीका केली.
अभिजीत दीपके यांनी सांगितले की, सुमारे 40 दिवसांच्या संघर्षानंतर आपण घरी परतलो असून, जंतर-मंतरवरील आंदोलनात देशभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हा संघर्ष आणि त्याला मिळालेले यश हे विद्यार्थ्यांचे असल्याचे त्यांनी म्हटले. इतक्या दिवसांनंतर आई-वडिलांना भेटता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

अभिजीत दीपके यांनी सरकारवर जोरदार टीका करत 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. सरकारमुळे विद्यार्थ्यांचे रक्त रस्त्यावर सांडल्याचा आरोप त्यांनी केला. विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असून त्यांच्या घरी जाऊन पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. अटक आणि ताब्यात घेण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगत, विद्यार्थी दहशतवादी नसून देशाचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.


दरम्यान सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला नाही आणि विद्यार्थ्यांशी अन्याय सुरूच ठेवला, तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. सध्या केवळ धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भविष्यातही सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत, तर हेच विद्यार्थी सरकार बदलण्याची ताकद दाखवतील, असे विधान त्यांनी केले.