काका-पुतण्याचा साताऱ्यात एकाच ठिकाणी मुक्काम, शरद पवार आजच एकत्र येण्याचा मोठा निर्णय जाहीर करणार?


सातारा : सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं शरद पवारांनी काल सांगितले होते.

त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.असे असताना आता शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते साताऱ्यात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रात्री सातारा सर्किट हाऊस येथे मुक्कामी आले होते. यामुळे साताऱ्यात आज शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी केंद्रात विरोधी पक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यावा लागेल, असे म्हटले होते. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात जर सगळे एकत्र आले, तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.

शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाल्यानंतर लगेच अजित पवार हे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. अजित पवार यांचा मुक्काम नव्याने बांधण्यात आलेल्या विश्रामगृहात तर त्याच्या शेजारील जुन्या विश्रामगृहात शरद पवार यांचा मुक्काम राहिला. यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे दोन्ही दिग्गज नेते साताऱ्यात दाखल झाल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत साताऱ्यात होईल की काय हे लवकरच समजेल. आज बहुतांश दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे आज या कार्यक्रमानंतर शरद पवार व अजित पवार एकत्र येऊन चर्चा होऊन मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत जाण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!