Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, तीन उमेदवार अर्ज मागे, ‘या’ पक्षासाठी सोडल्या जागा…

Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून अवघे काही तास शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने शेकापसाठी तीन जागा सोडणार असल्याचं जाहीर केलंय.
ठाकरे गटाने पणे, पनवेल आणि अलिबाग मतदारसंघात उमेदवार जाहीर केले होते. मात्र ठाकरे गटाने या तिन्ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या आहेत. या जागांवरील उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाने सांगितले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटले की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हे आघाडी धर्म पाळणार आहेत. जिथं बंडखोरी झालीय त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न असेल. दुपारपर्यंत लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
पेन, पनवेल आणि अलिबागमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. या तिन्ही जागा शेकापसाठी सोडण्यात येणार आहेत. तुन्ही ठिकाणचे उमेदवार अर्ज मागे घेतील. Uddhav Thackeray
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओकवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे.अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असून त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही दुपारी १२ वाजता सिल्वर ओकवर जाणार आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही तास आधी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.