ज्येष्ठ नागरिकाकडून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना..

पुणे : पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे कर्वेनगर परिसरातुन दोन मुलीचा एका ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकणी पीडित मुलीच्या ३९ वर्षीय वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोरेश्वर काणे (वय. ६० रा. कर्वेनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ७ वर्षाची मुलगी व त्यांच्या घराशेजारी राहणारी ८ वर्षाची मुलगी फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात असलेल्या बुद्धविहार समोरील मोकळ्या पटांगणात इतर मुलींसोबत खेळत होत्या. त्यावेळी आरोपी मोरेश्वर काणे याने फिर्यादी यांची मुलगी व शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत अशोभनिय वर्तन केले.
यानंतर या दोन पीडित मुली घराच्या पार्किंमध्ये उभ्या केलेल्या रिक्षामध्ये खेळत होत्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन मुलींचे चुंबन घेऊन गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.