ॲट्रॉसिटी, खंडणी व विनयभंगाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक…

लोणी काळभोर : खाजगी सावकाराकडून दुकानाच्या नुतनीकरण करण्यासाठी घेतलेल्या ५ लाखांच्या मोबदल्यात २१ लाख रुपये वसूल करूनही महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून छेडछाड केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी एका ४७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून राहुल लक्ष्मण काळभोर (रा. तरवडी, रानमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) व विशाल विठ्ठल काळभोर (रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. सदर

घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सन २०२० ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली होती. या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन्ही आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथून मंगळवार (७ ऑक्टोबर) रोजी अटक केली आहे.

फिर्यादी महिलेच्या दुकानाचे नुतनीकरण करावयाचे होते. म्हणून त्यांनी सन २०२० मध्ये राहुल काळभोर यांच्याकडून ५ लाख ८ हजार रुपये उधारीवर घेतले होते. परंतु त्याने तुम्हाला याची ४ टक्के व्याजाने परतफेड करावी लागेल असे सांगितले होते. त्यानंतर राहुल काळभोर त्यांच्याकडून दिलेल्या वेळोवळी एकुण २१ लाख रुपयेंची वसूली केली.
२१ लाख रुपये घेऊनसुद्धा त्याने आणखी पैशाची मागणी करत फिर्यादी व त्यांचे कुटुंबीयांना त्रास दिला. ८ ऑगस्ट २०२५ रोजी राहुल काळभोर व त्याचा मित्र विशाल काळमोर हे दोघे फिर्यादीच्या दुकानात आले. व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी राहुल काळभोर याने महिलेस अश्लील बोलुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु तेव्हापासून दोघे फरार झाले होते. पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर होते. पथकाला हे दोघे उरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. याच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
सदर कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संतोष राठोड, अण्णा माने, रामहरी वणवे, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, योगेश पाटील, शैलेश कुदळे, सुरज कुंभार, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे, बाजीराव वीर व त्यांच्या पथकाने केली आहे.
