दिल्लीत महिलेचा बिकणी घालून बसमध्ये सफर, संबंध प्रकाराने दिल्लीत गरमागरम चर्चा!!


नवी दिल्ली :  दिल्लीतील डीटीसी बसमध्ये एका महिलेचा बिकिनीमध्ये प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला बिकिनी घालून गर्दीच्या बसमध्ये चढते आणि प्रवाशांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. महिलेला असे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

काही लोकांनी बिकिनीमध्ये प्रवास करणे असे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तर काही जण महिलेचे समर्थन करताना दिसले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला बिकिनी परिधान करून बसमध्ये चढताना दिसत आहे.

तिला पाहून जवळ उभी असलेली दुसरी महिला तिच्यापासून दूर जाते. बिकिनी घातलेल्या महिलेला पाहून बस कंडक्टरही उठतो आणि तिथून ड्रायव्हरकडे जाऊ लागतो. महिलेला पाहून इतर काही लोकही जागेवरून उठताना दिसतात.  मात्र, हा व्हिडीओ दिल्लीतील कुठला आहे हे स्पष्ट झाले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!