अश्लील फोटोचा धाक, विवाहितेकडे केली नको ती मागणी; नकार देताच तरुणाचं धक्कादायक कृत्य


छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यात एका २२ वर्षीय विवाहित महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तिचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित आरोपी यांची पूर्वी ओळख होती. त्या काळात आरोपीने महिलेचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ स्वतःकडे जतन करून ठेवले होते. दरम्यान, महिलेचे लग्न झाल्यानंतरही आरोपी तिच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, वैवाहिक आयुष्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी महिलेने आरोपीशी संपर्क ठेवण्यास स्पष्ट नकार दिला. याच रागातून आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावरून महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिलेवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला.

सततच्या धमक्या आणि सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून अखेर पीडित महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!