शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, मुलालाही संपवणार असल्याचा मेसेज, उडाली खळबळ..


जालना : शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबाबत पोळी तपास करत असून एकच खळबळ उडाली आहे.

वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत, त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत सोशल मीडियावरील धमकी प्रकरणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले, आपण अशा धमक्यांना घाबरत नाही.

अलीकडच्या काळात सट्टा, मटका,आयपीएल आणि जमिनी घोटाळे उघड केल्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत असून आम्ही सर्व काही हलक्यात घेत नाही. सर्वांचा बंदोबस्त करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. याबाबत आता पोलीस काय कारवार करणार हे लवकरच समजेल.

दरम्यान, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आता त्यांची सुरक्षा वाढवली जाणार का? हे लवकरच समजेल. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!