कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ ; ‘आमच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलं’, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचा आरोपांचा बॉम्ब


मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांनीं बॉम्ब टाकला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 7 नगरसेवकांचा गट स्थापन झाला आहे. 4 नगरसेवक गट स्थापनेच्या बैठकीला गैरहजर होते. या चारही नगरसेवकांना डांबून ठेवल्याचा आरोप ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांनी केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला 50, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 53, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 11 तर मनसेला 5 जागांवर यश मिळालं आहे. बहुमतासाठी इथे 62 जागांचा आवश्यकता आहे.हा आकडा भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना वैयक्तिकरित्या गाठता आलेला नाही. पण दोन्ही पक्षांनी महापालिका निडणुकीत युती करत एकत्र निवडणूक लढवली होती.

महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु असल्याच कल्याण डोंबिवलीत दिसत आहे. महापौर पदासाठी नगरसेवकांच्या पळवापळवीच्या राजकारणाला बळ आल आहे. निकालानंतर ठाकरेंचे दोन नगरसेवर नॉट रिचेबल होते. तर आणखी दोन नगरसेवकांनी ठाकरेंच्या गटनेता पदाच्या निवडीच्या बैठीकाला गैरहजेरी लावली. त्यामुळे ठाकरेंच्या केवळ 7 नगरसेवकांचा गट स्थापन झाला. त्यांचे चार नगरसेवक बेपत्ता असल्याने खळबळ उडाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 59 नगरसेवकाच्या गटाची नोंदणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार नगरसेवक त्यांच्या सोबत असल्याची चर्चा आहे.ठाकरे गटातून निवडून आलेले हॆ चार नगरसेवक निवडून आलेल्या दिवसापासून बेपत्ता आहेत. हे नगरसेवक मनसे आणि शिवसेनेच्या ताब्यात असल्याची चर्चा आहे. ते शिवसेना आणि मनसेने हे नगरसेवक आपल्या संपर्कात नसल्याचा दावा  केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!