पुण्यात रक्ताचा मोठा तुटवडा, शहरात 15 दिवस पुरेल एवढेच रक्त..

पुणे : पुणे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये दहा ते पंधरा दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. यामुळे रक्तदानाचे प्रमाण न वाढल्यास महिनाअखेरीस तुटवडा वाढू शकतो. यामुळे ही एक चिंतेची बाब आहे.

पाणीसाठ्याप्रमाणे रक्तसाठ्याचेही नियोजन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उष्णतेमुळे बरेचदा हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होते. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाणही वाढले होते. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अनेकजण नुकतेच आजारपणातून उठल्यामुळे लगेच रक्तदान करत नाहीत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस रक्ताचा तुटवडा जाणवल्यास रुग्णांची आणि नातेवाईकांची धावपळ होऊ शकते.

यासाठी विविध संस्था आणि रक्तपेढ्यांकडून नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात रक्तदान वाढले नाही, तर मोठ्या प्रमाणावर कमतरता भासू शकते.
