सरकारी नोकरीत असूनही 200 रुपयांचा मोह; पुण्यात दोन पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल, तात्काळ निलंबन…


पुणे : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून अधिकृत दंड न आकारता थेट पैसे स्वीकारल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पुण्यात दोन वाहतूक पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सहकारनगर वाहतूक विभागातील दोन पोलिसांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिम्मत जाधव यांनी तत्काळ दखल घेत हवालदार अंकुश रामा पवार आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे यांना निलंबित केले.

रविवारी (१९ मे) शारदा आर्केड चौकात ड्युटी दरम्यान, संबंधित पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई न करता काही चालकांकडून १५० ते २०० रुपये थेट स्वीकारल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, हे पैसे अधिकृत सरकारी खात्यात जमा न करता इतरांच्या ऑनलाइन स्कॅनरद्वारे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

दरम्यान, अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक पोलिसांना पारदर्शक कारवाई करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.

चौकशीदरम्यान संबंधित पोलिसांनी अधिकृत दंडाऐवजी थेट पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!