प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, पण किती वाजता? कसा पाहायचा?, जाणून घ्या..


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल कधी लागणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सुरुवातीला बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर हा निकाल १५ तारखेचा आत लागेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र आता थेट निकालाची तारीखच समोर आली आहे.

उद्या सोमवारी ५ मेला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे.

६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.

कुठे पाहता येणार निकाल?

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!