दिग्गज क्रिकेटपटूचे दुःखद निधन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रिकेट विश्वावर शोककळा…


नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून सध्या एक दुःखद बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू हिथ स्ट्रीक यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी काळाने झडप घातली आहे.

त्यांच्या निधनाने क्रिकेट आणि क्रिडा विश्वावर शोककळा पसरली आहे. ते कर्करोगाशी लढत होते. अखेर त्यांच्या निधनाची वार्ता आली. मैदानावर उत्कृष्ठ खेळी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी ते एक होते.

स्ट्रीकने त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीत 65 कसोटी सामने आणि 189 एकदिवसीय सामने खेळले. हिथ स्ट्रीक यांनी आपल्या एकूण कारकीर्दीत 28.14 च्या सरासरीने 16 चार-विकेट आणि Seven Five-Fers सह सामन्याच्या सर्वात दीर्घ फॉरमॅटमध्ये 216 बळी घेतले.

एकदिवसी सामन्यांमध्येही दमदार कामगीरी दाखवत त्यांनी 29.82 च्या सरासरीने 239 बळी घेतले. त्यांच्या एकदिवसीय कारकीर्दीत त्याने सात चार विकेट्स आणि एक फिफर (5/32) मिळवले. कर्णधार म्हणूनही त्यांनी झिम्बब्वे क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले.

आपल्या फलंदाचीच्या कारकीर्दीत त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये एकूण 2943 धावांसह 1990 धावा केल्या. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!