पुणेकरांनो सावधान! आज ‘या’ मुख्य रस्त्यांवर मोठे ट्रॅफिक बदल; बाहेर पडण्याआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग..


पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शहरात, विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

गर्दी आणि विविध रॅलींच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.

स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित वाहने आता जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि टिळक रस्ता या पर्यायी मार्गाने स्वारगेटकडे वळविण्यात येणार आहेत.

पीएमपी बस मार्ग..

महापालिका भवनाकडे जाणाऱ्या पीएमपी बस आता स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता आणि झाशीची राणी चौकामार्गे आपल्या नियोजित स्थळी पोहोचतील.

हुतात्मा चौक (बुधवार चौक)..

आप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशबंदी असेल. वाहनचालकांना बाजीराव रस्त्याचा वापर करावा लागेल.
गणेश रस्ता:

लाल महाल चौकातून गणेश रस्त्याकडे जाणारी वाहतूकही थांबवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, अग्निशमन दल इ.) वगळता इतर सर्व खासगी वाहने आणि पीएमपी बससाठी हे बदल लागू राहतील. गर्दी ओसरेपर्यंत हे बदल कायम राहणार असल्याने पुणेकरांनी सहकार्य करावे आणि शक्यतो मध्यभागातील गर्दीच्या रस्त्यांवर जाणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!