पुण्यातील महापौर निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला! पुण्यनगरीत नवा कारभारी कधी कोण होणार? जाणून घ्या…


पुणे : पुण्यात महापौर बसवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या ६ फेब्रुवारीला होणार पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे. पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार ही सभा घेण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणाऱ्या पालिकेच्या या सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवड करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या १६५ जागांपैकी ११९ जागी भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे केले जातात की, या निवडी बिनविरोध होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, नव्या महापौराच्या स्वागतासाठी पुण्यातील महापौर बंगला नव्या महापौरासाठी सज्ज होत आहे. राज्यात २०२२ नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे नवा महापौरही नाही. त्यामुळे आता नव्या महापौरासाठी या बंगल्यात रंगकाम अन् फर्निचरचं काम सुरु करण्यात आलं आहे. या बंगल्यानं पुणं बदलताना पाहिलंय. अनेक नवे निर्णय स्विकारताना पाहिले आहे.

पुण्याच्या बदलत्या रुपाचा हा बंगला साक्षीदार आहे, कारण अनेक महत्वाचे निर्णय सर्वात आधी याच बंगल्यात विचारासाठी घेतले गेले आहेत. पुण्यात यंदा महिला राज असणार आहे. महापौर पद कोणाला मिळेल, पुण्यात देवेंद्र फडणवीस कोणत्या लाडक्या बहिणीला संधी देतात हे काही दिवसांत स्पष्ट होईल आणि पुन्हा एकदा धामधुमीत नवा महापौर या बंगल्यात वास्तव्यास येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!