नाशिकमध्ये गेम फिरला! शिंदे सेनेला मोठा धक्का, अपक्ष गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय


नाशिक : विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या नाशिक मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असली तरी गीते समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गीते यांना 389 मते मिळाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात त्यांच्या समर्थकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर “हमसे जो टकरायेगा, वो मिट्टी में मिल जायेगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

नाशिकची जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आली होती आणि नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बंडखोरीमुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. अखेर अपक्ष उमेदवाराने बाजी मारल्याने हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पहिल्या फेरीतच गोकुळ गीते यांना 357 मते मिळाली, तर नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली. मोजणीदरम्यान 13 मते अवैध ठरल्याने विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गीते यांनी पहिल्याच फेरीत हा कोटा पार केल्याने दुसऱ्या फेरीची गरज भासली नाही.

नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना माघार घेण्यासाठी शिवसेनेचे नेते उदय सामंत, भाजप नेते गिरीश महाजन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले होते. उदय सामंत यांनी अनेकदा नाशिक दौरे करून चर्चा केली होती.

प्रचारादरम्यान गोकुळ गीते यांनी आपली भूमिका कायम ठेवली आणि अखेर निकाल त्यांच्या बाजूने लागला. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये भाजपची ताकद असूनही महायुतीला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊ शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!