मोठी बातमी! नागपूर दंगल प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड अखेर समोर, कोण आहे तो?


नागपूर : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील महाल आणि लगतच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदाच समोर आले असून, पोलिसांनी त्यावर मोठा दावा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरु आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ही कबर हटवावी अन्यथा बाबरीप्रमाणेच परिणाम होईल, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर नागपुरात मोठा हिंसाचार झाला.

दोन गटांमध्ये संघर्ष उफाळल्यानंतर शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. आता या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचे नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिस तपासात समोर आले आहे की, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दाखल झालेल्या तक्रारीनुसार, जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाच्या थडग्याचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, ज्याचा निषेध करण्यासाठी फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!