नेत्याला गावात कमी पडले मतदान , गावकऱ्यांना सहन होईना ! उत्तमराव जानकर यांना त्यांच्या हक्काच्या गावात कमी मते पडल्याने ग्रामस्थांनी काय केली मागणी वाचा ….!


सोलापूर: संपूर्ण राज्यात ईव्हीएम घोटाळा झाला म्हणून महाविकास आघाडीकडून आक्रोश सुरू आहे.अशातच सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएमवरून लोकशाही वाचवा म्हणून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाने विरोधी पक्षांना आयते बळ मिळाले आहे. आता विधानसभा निवडणुकीत एका विजयी उमेदवाराला त्यांचे प्रभूत्व असलेल्या गावात कमी मते मिळाल्याने या गावाने तहसिलदारांकडे फेरमतदान बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे खर्डे वक्ते उत्तमराव
जानकर यांना मतदारसंघात विजयी होताना मोठे झुंझावे लागले आहे.आता एक माहिती समोर आली आहे की,उत्तमराव जानकर हे त्यांचे प्रभूत्व असलेल्या गावात पिछाडीवर राहिल्याने गावकरी संभ्रमात पडले आहे. या गावातच विजयी आमदार पिछाडीवर पडल्याने मतदानाची बरीच चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावानेच आपला नेता गावात मागे पडल्याने थेट तहसीलदारांकडे बॅलेट पेपरवर आमच्या गावाचे मतदान घ्या अशी मागणी केली आहे. ज्या गावांमध्ये उत्तम जानकर यांना मोठे मते देखील मिळते, त्या गावात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

 

विधानसभेच्या निवडणुकीत या गावात उत्तम जानकर यांना 843 मते तर विरोधी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 1 हजार 3 मते मिळाल्याचे दिसून आले. यापूर्वी झालेल्या 2009 पासून च्या तीन निवडणुकांमध्ये आणि लोकसभा निवडणुकीत देखील गावात 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाले. त्या संदर्भातील पुरावे जोडले आहेत. या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आक्षेप घेत तपासण्यासाठी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या असा ठराव गावाने केला असून त्याचा संपूर्ण खर्च आमचा गाव भरण्यास तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!