निवडणुकीआधी वातावरण तापलं : राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचं श्रेय फडणवीस सरकार लाटतंय? पर्यटन विभागाच्या पोस्टमुळे मनसेचा संताप


मुंबई : गेल्याच आठवड्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब उपस्थितीत दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यादीपोत्सवावरून राजकीय वातावरण आता चांगलंचं तापलं आहे.
कारण महाराष्ट्र पर्यटन विभागाने सोशल मीडियावर ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून मुंबईबाहेरील पर्यटकांना आवाहन केलं आहे. यावरून आता मनसे आक्रमक झाला आहे. मनसेने पोस्ट करून जोरदार टोला लगावला आहे.

मनसे अधिकृतची पोस्ट?

“महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरुन मुंबईतील शिवाजी पार्क मैदान येथील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या, असं मुंबई आणि मुंबईबाहेरील पर्यटकांना आवाहन केलं आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आहे. या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव करत आहे. हा दीपोत्सव जरी मनसे करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं, आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील” असं मनसेने सोशल मीडियावर लिहिलं आहे.

       

महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून मुंबईतील दिवाळी संदर्भात पोस्ट एक्सवर शेअर करण्यात आली होती. यामध्ये दिवाळीचे जादू पाहायला चला,तुम्ही जर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा दीपोत्सव पाहिला नसेल तर मुंबईचा सर्वात शानदार प्रकाशमय तुमच्याकडून मिस होत आहे, असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, अशा शब्दात मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊण्टवरुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांना टॅग करुन प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!