महाविकास आघाडीत मोठी फूट? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकीय वर्तुळात खळबळ


पुणे : पुणे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजीनाट्य उफाळल्याचं चित्र दिसत आहे. काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने आघाडीला मोठा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या निर्णयानंतर संबंधित उमेदवारांवर घटक पक्षांकडून कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) नाराज असल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) चे नेते वसंत मोरे यांनीही या घडामोडींमुळे पक्षाचं नुकसान झाल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!