मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी मागणी मान्य, राज्य सरकारचा मोठा निर्णय….

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे अनेकदा आंदोलन करत असून सरकार आश्वासन देत आहे. असे असताना विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. आठ जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून वारसांना मदत देण्याची ग्वाही दिली होती.
त्यानंतर आज राज्य सरकारकडून तातडीने मदत मंजूर करण्यात आली आहे. या आंदोलनांत एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत.

यामध्ये 34 व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणे अद्याप बाकी होते. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता. आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, विविध जिल्ह्यांतील एकूण 34 मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपये, याप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर केली आहे. यामुळे अनेकांच्या कुटूंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.