जेजुरी कोळविहिरे रोडवर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू…

जेजुरी : येथील पुरंदर तालुक्यातील जेजुरी कोळविहिरे रस्त्यावर पीकअप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघा तरुणांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास झाला. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
प्रशांत शिंदे (वय 21) व मुजमिल शेख (वय 22) या दोघा तरुणांचा या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (दि.14) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास जेजुरी कोळविहिरे रस्त्यावर पीकअप व दुचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचा मृत्यू झाला.
याबाबत जेजुरी पोलिसांनी माहिती दिली. या अपघातात प्रशांत शिंदे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुजमिल शेख या तरुणांचा उपचारादरम्यान मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या अपघाताचा तपास करीत आहेत. या घटनेत दोन्ही गाड्याचा अक्षरशः भुगा झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत सध्या पोलीस तपास सुरू आहे.