चौफुला येथे भीषण अपघात ; कार आणि ट्रॅव्हलसच्या अपघातात वरवंडीतील तरुण जागीच ठार

दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला, बोरिपार्धी हद्दीत पुणे- सोलापूर महामार्गावर ईर्टिका कार आणि खाजगी बस ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात वरवंड येथील तरुण गणेश दिवेकर (संपूर्ण नाव समजले नाही,रा.वरवंड, ता.दौंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र साबळे हा गंभीर जखमी झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास पुणे दिशेकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बसने महामार्गचे डिव्हायडर तोडून ती वरवंड दिशेकडे निघालेल्या इर्टीका कारला समोरून धडक दिली. या अपघातामध्ये कार मधील गणेश दिवेकर हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला तर त्याचा मित्र साबळे हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

Views:
[jp_post_view]
