डी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजी


पुणे : अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२५ (टीएआयटी) साठी प्रविष्ट झालेल्या डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डी.एल.एड.) द्वितीय वर्षाचे अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची टीएआयटीची ऑनलाइन परीक्षा ३ जून ऐवजी ३० मे २०२५ रोजी नियोजित आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी बदलाची नोंद घेऊन सुधारित तारखेला परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२५ या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याची नियोजन २७ ते ३० मे २०२५ व २ ते ५ जून २०२५ या कालावधीत करण्यात आलेली आहे.

तथापि, १ हजार १०७ उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी/उमेदवारांची डी.एल.एड. परीक्षा व (टीएआयटी) परीक्षा एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती तपासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घ्यावीत. नियोजित परीक्षेस उपस्थित व्हावे, याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवारावर राहील याची नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी कळविली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!