बीडमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या अपहरणाचा संशय? कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या, पण पोहोचल्याच नाहीत; ३ दिवसांपासून बेपत्ता


बीड : बीड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

१८ नोव्हेंबरपासून महिला कॉन्स्टेबल बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कॉन्स्टेबल १८ नोव्हेंबर रोजी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या कार्यालयात पोहोचल्याच नाहीत. बराच वेळ होऊनही त्या घरी परतल्या नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

रितिक वडमारे याच्याविरोधात अपहरणाची तक्रार

महिला कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी रितिक ईश्वर वडमारे याच्यावर अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, बेपत्ता महिला कॉन्स्टेबलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्या घरातून निघाल्यानंतर नेमक्या कुठे गेल्या, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही माहिती मिळते का, याचा तपास केला जात आहे. महिला पोलीस कर्मचारीच बेपत्ता झाल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!