दहावीच्या विद्यार्थ्याने केला आयुष्याचा शेवट!! सूर्यवंशी सर रागावले, आई-वडिलांवरून बोलले म्हणून….


नांदुरा : नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जय बजरंग विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या १५ वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

विवेक राऊत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेकने सुसाईड नोट लिहून शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वर्गातील प्रश्नांची उत्तरे न आल्यामुळे शिक्षक सूर्यवंशी यांनी विवेकवर राग व्यक्त केला आणि त्याच्या आई-वडिलांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. हा राग विवेकच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला. मधल्या सुट्टीत तो गावाजवळील शेतात गेला आणि तेथे गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

विवेकच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, “सूर्यवंशी सरांनी मला रागावले, आई-वडिलांबद्दल बोलले, त्यामुळे मी फाशी घेत आहे.” या एका वाक्याने शिक्षणसंस्थांमधील शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंधांवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव टाकण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे.

दरम्यान, ही घटना शाळा सुरू होऊन अवघ्या काही आठवड्यांतच घडल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, संबंधित शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!