ज्यांच्यासाठी आयुष्यभर झटलं, त्यांच्याच त्रासाला कंटाळून बापाने संपवलं आयुष्य; पुण्यातील हादरवणारी घटना..


पुणे : शुक्रवार पेठ परिसरात एका व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात पत्नी, मुलगा आणि मुलीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव मनोहर पायगुडे (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घरगुती वाद आणि मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी रवींद्र मनोहर पायगुडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, राजीव पायगुडे यांना पत्नी मनीषा ऊर्फ मंगल पायगुडे, मुलगा रोहित पायगुडे आणि मुलगी स्मृती पायगुडे यांच्याकडून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.

तक्रारीच्या आधारे खडक पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कौटुंबिक वादांचे वाढते प्रमाण आणि त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंची पडताळणी करून तपास करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!