Supriya Sule : हिंमत असेल तर कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवाच!! सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट इशारा, नेमकं घडलं काय?

Supriya Sule : पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा औपचारिक समारंभ होणार आहे. यासाठी महायुतीसह भाजपमधील सर्व पक्षश्रेष्ठी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आजच्या कार्यक्रमाला ज्या भगिनी येणार नाहीत, त्यांचे फॉर्म रद्द होतील, असा धक्कादायक मेसेज पाठवला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन केला आहे. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असं थेट चॅलेंजच सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. Supriya Sule
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवत आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलावणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार, अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं, असं सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत ठणकावलं आहे. Supriya Sule
बालेवाडीतील कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत आरोप केला आहे. या ट्विटद्वारे त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरत खडेबोल सुनावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून काल मविआच्या निर्धार मेळाव्यातही त्यांनी सरकारवर टीका केली होती. आता बालेवाडीतील कार्यक्रमापूर्वी फिरणाऱ्या एका मेसेजेच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी सरकारला चांगलंच खडसावलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो,… pic.twitter.com/lRiUz3e1Kv
— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2024
व्हायरल झालेल्या त्या मेसेजमध्ये काय म्हटलंय ?
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी १७ ऑगस्ट २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडिअम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी ज्या महिलांनी हाँ फॉर्म भरला आहे व त्याचे approval मेसेज आला आहे. त्यांनी या कार्यक्रमाला हजर रहावे यासाठी पुणे महानगरपालिकने अहिल्याबाई होलकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी ९.३० वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे, सर्वांनी येणे आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल’ असे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.