Supreme Court : ब्रेकिंग! महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली…

Supreme Court : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महाराष्ट्रात महायुतीला २३० जागांवर यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागांवर यश आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचं? याबाबत ठरवत होते. पण निकाल अतिशय वेगळा लागला.
त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या निकालावर संशय निर्माण करत आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा केला जात आहे. Supreme Court

याच दाव्यासह महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीने बॅलेट पेपवर निवडणूक घेण्याची मागणी याचिकेत केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे.
मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.